गडचिरोली: बसचे एक्सल तुटले, २५ प्रवासी बालंबाल बचावले : चालकाचे प्रसंगावधान | Batmi Express

Be
0

Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli Bus,Gadchiroli News,Gadchiroli live,Aheri,

गडचिरोली : 
अहेरी बस आगारातून सिरोंचा मार्गाने सकाळी ९:३० वाजता निघालेल्या मानव विकास मिशनच्या बसेसचे एक्सल उमानूर पहाडीवर तुटले. ही बाब वेळीच चालकाच्या लक्षात आली व त्याने बस जागीच रोखली सुदैवाने अपघात टळला व बसमधील २५ प्रवासी बालंबाल बचावले.

ही घटना मंगळवारी दुपारी १२:३० वाजता सिरोंचा पासून ३२ किमी अंतरावर घडली.

अहेरी बस आगाराची अहेरी- आसरअल्ली- सिरोंचा ही बस मंगळवारी सकाळी ९:३० वाजता अहेरीवरून निघाली. ही बस अहेरी, सिरोंचा व त्यानंतर आसरअल्लीला जाते. या बसमध्ये बहुसंख्य प्रवासी होते. हा मार्ग खड्डेमय असल्याने या मार्गाने नागरिकांना बसमधून प्रवास करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यातच मंगळवारी मानव विकास मिशनची बस उमानूर पहाडीवर आली असता, अचानक बसचे एक्सल तुटले.

ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने बस थांबवली. बस सुरूच राहिली असती तर ती उलटण्याचा धोका होता. चालकाने बस जागीच थांबविल्याने प्रवासी बसमधून खाली उतरले. त्यानंतर प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली.अहेरी- सिरोचा मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->