गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज, भीक मांगो आंदोलन | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,

Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,

गडचिरोली: 
जिल्ह्यातील खेळाडू आणि स्पर्धा परीक्षेची (पोलीस, वनरक्षक भरती ) तयारी करणाऱ्या युवकांना अत्याधुनिक जिल्हा क्रीडा संकुल असावे, या उद्देशाने महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना, भरीव निधी देऊन क्रीडा संकुलच्या कामास सुरुवात करण्यात आली, मात्र शिंदे - भाजप सरकार सत्तेत आल्यापासून क्रीडा स्टेडियम च्या कामास नियमित निधी दिल्या् जात नसल्याने क्रीडा स्टेडियम चे काम रखडले आहे, त्यामुळे अनेक खेळाडू आणि स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या युवकांना त्रास होत आहे, त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुल च्या कामाला लवकरात लवकर भरीव निधी देऊन सरकारने तातडीने क्रीडा संकुलाचे काम करावे या मागणीला घेऊन, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने "भिख मांगो आंदोलन" करण्यात येणार आहे.  तरी जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सह क्रीडाप्रेमी, खेळाडू आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे करावे.


दिनांक : 8-01-2024

वेळ- सायंकाळी 4 वाजता

ठिकाण : जिल्हा क्रीडा स्टेडियम, पोटेगाव बायपास, गडचिरोली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.