तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Breaking! वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli Tiger Attack,Tiger Attack,

गडचिरोली
:-गडचिरोली वरून अवघ्या पाच किलो मि. अंतरावरील वाकडी येथील एका महिलेला वाघाने पकडून ठार केल्याची घटना आज दि. 3 जानेवारी १२ वाजताचे दरम्यान घडली. मंगला विठ्ठल बोळे रा . वाकडी वय ५० वर्ष हि शेतावर गेली असता ती जंगलाच्या बाजुने काळ्या तोडण्या करीता गेली झुडपात दबा धरून बसलेल्या मंगला हिला वाघाने पकडून ठार केल्याची आजची ताजी घटना घडली.

 गावकर्यानी वनविभाग व पोलिस स्टेशन गडचिरोली येथे माहीती दिली असता वनविभाग कर्मचारी व गडचिरोली पोलीस घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले . तिच्या पश्चात दोन मुले असुन पती मात्र निफ्रद्रा ( निमगाव ) येथे राहत असुन तिच्या मृत्युमुळे वाकडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असुन. यापूर्वी हिरापुर गावातील महिलेला सुध्या वाघाने ठार केले होते. सदर परिसरात वाघाची दहशत पसरली असुन सदर वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.