नक्षल पुन्हा सक्रिय; जनता दरबारातच नक्षलवाद्यांनी उपसरपंचाची धारदार शस्त्राने वार करुन केली हत्या | Batmi Express

Chhattisgarh,Chhattisgarh Live,Chhattisgarh Naxal,Chhattisgarh Crime,Chhattisgarh Naxal News,Chhattisgarh News,
Chhattisgarh,Chhattisgarh Live,Chhattisgarh Naxal,Chhattisgarh Crime,Chhattisgarh Naxal News,Chhattisgarh News,

  • छत्तीसगढ राज्यात नक्षल्यांचे हत्यासत्र सुरूच 
  • पीएलजीए सप्ताहाच्या पूर्वीच नक्षल्यांचे तांडव 
  • क्रिष्णा गावडे तालुका प्रतिनिधी अहेरी

कांकेर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त छोटा बेठिया पोलीस स्टेशन हद्दीतील कांदाडी येथील उपसरपंच रामसू कचलामी यांची नक्षल्यांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
नक्षल्यांनी २९ नोव्हेंबरला कांदाडी गावचे उपसरपंच रामसू कचलामी यांचे घरातून अपहरण केले होते. उपसरपंच हे पोलिसांचे खबरी असल्याचा आरोप करत जनता न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावली व त्यानंतर जनता दरबारातच धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचे कळते. नक्षल्यांनी पत्रक टाकून हत्या केल्याचेही सांगितले आहे.
दरम्यान पीएलजीए सप्ताहाच्या पूर्वी नक्षल्यांनी मोबाईल टॉवरला ही आग लावली तसेच पक्के रस्तेही खोदून ठेवल्याचे कळते.  उपसरपंच रामसु यांची हत्या झाल्यानंतरही  कुटुंबीयांनी नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी अद्याप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नसल्याचे समजते.
छत्तीसगड मध्ये नक्षल्यांचे हत्यासत्र सुरूच असून काही दिवसांपूर्वीच तिघांची हत्या केली होती.तसेच गडचिरोली जिल्ह्यातही नक्षली पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या करीत आहेत. या घटनेने परिसरात दहशत पसरली असून भीतीचे वातावरण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.