गडचिरोली :: मागील अनेक दिवसापासून जिल्ह्यात जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघाची धुमाकूळ चालू आहे, अश्यात अवकाळी पावसाने लावेल्या हजेरीने जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी गडचिरोली जिल्हातील नुकसानग्रस्त भागाची पाहनी केली. व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, व आगामी काळात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संपूर्ण काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस पार्टीचे सर्व आमदार गडचिरोली जिल्ह्याच्या व जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या समस्या सभागृहात लावून धरणार व शेतकरी राजांच्या झालेल्या नुकसानीचा योग्य तो मोबदला मिळवून देण्याकरिता आपण पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले.
त्यांनी चामोर्शी तालुक्यातील अनखोडा, येणापूर, अड्याळ, सह अनेक गावांना भेटी दिल्या व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
या दौऱ्यादरम्यान गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्व्जीत कोवासे, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, जिल्हाउपाध्यक्ष नीलकंठ निखाडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सोशल मीडिया अध्यक्ष संजय चन्ने, जावेद खान, प्रफुल बारसागडे, मुन्ना गोंगले, यादव मेश्राम, हेमंत कुमरे, विश्वास बोमकंटीवार, कोमल आकेवार, बाळूभाऊ निखाडे, नेहाल आभारे, तेजस कोंडेकर,विवेक दांडे , शेतकरी विनोद येलमुळे व जयराम राऊत सह यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.