गोंदिया :- पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणातून खटके उडत होते.त्याच कारणावरून रागाच्या भरात आरोपीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना सालेकसा तालुक्यातील टोया गोंदिया येथे १९ डिसेंबर रोजी दुपारी घडली. केवल सीताराम नेवरा (वय ३८ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे.
छत्तीसगड राज्यातील उरई येथील गोपाल सुरदेव निर्मलकर वय ६५ वर्षे यांची मुलगी आशा हिचे लग्न गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील टोयागोंदी येथील केवल सीताराम नेवरा याच्यासोबत झाले होते.केवल नेवरा हा पत्नी आशा सोबत नेहमी भांडण करीत होता.हे नित्याचेच झाले होते.१९ डिसेंबर रोजी त्यांच्यात पुन्हा वाद झाला रागाच्या भरात आरोपी केवल नेवरा याने त्याची पत्नी आशाचा गळा दाबला.यात तिचा मृत्यू झाला.गोपाल सुरदेव निर्मलकर यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद राऊत हे करीत आहेत.