चिमुर :- कोटगाव मध्ये गावालगत असलेल्या गुरांच्या कोठ्यामध्ये शिरुन वाघाने हल्ला केला, या हल्ल्यामध्ये वाघाने गरोदर असलेल्या गाईला गंभीर जखमी केले तर बैलावर सुद्धा वाघाने हल्ला केला आहे ही घटना चिमूर तालुक्यातील कोटगाव येथे दि १९ ला घडली . गावाशेजारी दडी मारून बसलेल्या वाघाने रात्री नऊ वाजताच्या दरम्यान दामोदर दडमल यांच्या गुराच्या गोठ्यावर हल्ला केला. वाघाने हल्ला करताच गुरांच्या गोठ्या लगत असलेल्या घरा जवळील लोकांनी आरडाओरड केली त्यामुळे वाघाने पळ काढला, संबंधित घटनेला काही तास झाले असताना सुद्धा कुठलीही सरकारी यंत्रणा गावामध्ये हजर झाली नाही.
त्यामुळे गावातील असंतोष वाढत गेला नागपूर अधिवेशनाला गेलेले ग्रामपंचायत सदस्य तथा साप्ताहिक पुरोगामी संदेश चे सहसंपादक गावामध्ये पोहोचताच वन विभागाची सर्व कर्मचारी रात्री अकरा वाजता घटनास्थळी दाखल
झाले. व त्यांनी स्थळ पंचनामा केला.गायीची परिस्थिती पाहता गाय मृत्यू पावणार यात शंका नाही त्यामुळे
दामोदर दडमल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे यात शंका नाही, वाघाच्या या हल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता कुठलीही जीवित आणि होण्याअगोदर गावालगत कॅमेरे लावून वाघावर नियंत्रण ठेवावे अशी नागरिकांची मागणी आहे
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.