गडचिरोली: हत्ती आणि वाघाचा बंदोबस्त करा म्हणत गडचिरोली च्या हजारो शेतकऱ्याचा चंद्रपूरात ठिय्या आंदोलन | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli Today,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,
Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli Today,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,


  • हत्ती आणि वाघाचा बंदोबस्त करा 
  • गडचिरोली च्या हजारो शेतकऱ्याचा चंद्रपूरात ठिय्या आंदोलन

गडचिरोली :: गडचिरोली जिल्ह्यात मागील अनेक दिवसापासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघाच्या हल्यात वाढ झाली आहे. गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने वेळोवेळी निवेदन आणि आंदोलनाच्या माध्यमातून मागणी केली असताना देखील वणविभागाच्या वतीने यावर कुठल्याही प्रकारचे ठोस पाऊले उचलल्या गेली नसल्याने, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात थेट वनमंत्र्याच्या घरावर गृह जिल्ह्यात चंद्रपूर येते, रानटी हत्ती आणि नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा या सह इतर मागण्याना घेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli Today,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,

यावेळी आंदोलनात आमदार सुभाष धोटे आणि आमदार सुधाकर अडबाले यांनी ठिय्या आंदोलनास भेट देऊन निवेदन स्वीकाराले, व येणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गडचिरोली जिल्ह्याच्या समस्यांना लावून धरण्यासंदर्भात आश्वासत केले. आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांच्या सोबत भ्रमनध्वनी द्वारे संभाषण केले असता  मा. वनमंत्र्यांनी  गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी च्या शिष्टमंडळास बैठकीकरीता 11 डिसेंबर, 2023 रोजी, नागपूर येते बोलावले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, जि. प. माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी,  युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेस अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस नेते दिनेशज चोखारे,नेताजी गावतुरे, शंकरराव सालोटकर, परसराम टिकले, रमेश चौधरी, तालुकाध्यक्ष गडचिरोली वसंत राऊत, आरमोरी मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी प्रमोद भगत, वडसा राजेंद्र बुल्ले,  रजनीकांत मोटघरे, वामनराव सावसाकडे, भूपेश कोलते,  दत्तात्रय खरवडे,  भारत येरमे, राजेश ठाकूर,  संजय चने,  हरबाजी मोरे, नितीन राऊत, अनिल कोठारे, विशवेश्वर दरो, दिवाकर निसार, कविता भगत, वैशाली ताटपल्लीवार, वृंदाताई गजभिये, कल्पना नंदेस्वर, पुष्पा कोहपरे, नीता गोवर्धन, भारती कोसरे, रजनी आत्राम, सुरेश भांडेकर, संदीप भैसारे, ढिवरू मेश्राम, जावेद खान, राजाराम ठाकरे, रामभाऊ नन्नावरे, रजाक पठाण, उत्तम ठाकरे, सुभाष धाईत, समीर ताजने, बंडोपंत चिटमलवार, जितेंद्र मुनघाटे, स्वप्नील ताडाम, प्रवीण रहाटे, नितेश राठोड, शालिक पत्रे, विजय सुपारे, सुरेश भांडेकर, बापूजी लेनगुरे, रमेश मानकर, सुधाकर जेंगते, आशिष नक्षिने, रमेश चापले, दिवाकर अलोणे, श्रीधर जेंगते, योगेंद्र झंजाळ, निकेश कामीडवार, श्रीकांत कथोटे,मुन्नासिंग चंदेल, अनिल किरमे, दिवाकर पोटफोडे, सूरज भोयर, शालूताई मेश्राम, अर्चना मडावी, रघुनाथ मोगरकर, अरविंद फटाले सह हजारोच्या संख्येने शेतकरी, महिला, काँग्रेस, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते


या मागण्यांना घेऊन करण्यात आले आंदोलन:

१) जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा.

२) हत्ती, वाघ किंवा अन्य कोणत्याही वन्यप्राण्याच्या हल्यातील जखमी व मृत व्यक्तीच्या कुटुंबास तातडीने भरवी आर्थिक मदत करण्यात यावी.

३) वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांचा जीव जात असल्याने वनअधिकाऱ्यांना गृहीत धरून मुख्य वनरक्षक आणि उपमुख्य वनरक्षक यांच्यावर भादवी 302 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे.

४) जंगली  प्राण्याच्या हल्यात नुकसान झालेल्या शेती आणि घरांचे पंचनामे कुठल्याही  प्रकारच्या जाचक अटी न लादता (ऑनलाईन प्रक्रियेत वेळ न घालवता ) सरसकट किमान 25 हजाराची आर्थिक मदत करण्यात यावी.

५) वनपट्याचे प्रलंबित मागण्या निकाली काढून वनपट्टे व सातबाऱ्याचे वितरण करण्यात यावे.

६) हत्ती आणि वाघाचे लोकेशन ट्रेस करण्याकरिता वनविभागाला अत्याधुनिक ड्रोन कॅमेरा ची व्यवस्था करून देण्यात यावी.

७) वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्याने जंगलालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी पडीत ठेवल्यामुळे त्यांना एकरी 20 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी.

८) सुरजागड येथे होणाऱ्या अवैद्य वृक्षतोडीची चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाही करण्यात यावी.

९) वनविभागाच्या परवानगीकरिता रखडलेले जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांच्या कामांना तत्काळ मंजुरी देण्यात यावी.

१०) जंगलव्याप्त परिसरातील शेतांच्या संरक्षणासाठी शेतकर्यांना चेनलिंग फेन्सिंगची व्यवस्था करण्यात यावी.

११) रोजगार निर्मितीच्या दृष्टीकोनातून कमलापूर सह जिल्ह्यातील वन पर्यटन स्थळांचा विकास करण्यात यावा.

१२) गडचिरोली जिल्ह्यातील वनविभागातील रिक्त पदांची तातडीने भर्ती करण्यात यावी.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.