गडचिरोली :- आज दिनांक १५ डिसेंबर २०२३ दुपारी १ वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील मौजा - गोविंदपुर येथील माया धर्माजी सातपुते रा. गोविंदपुर ता. जि. गडचिरोली वय (५५ - ६० ) येथील रहिवासी असून सदर महिला सरपण गोळा करण्यासाठी गावाच्या जवळच गेली असता वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केलं आहे..
या सदर घटनेची माहिती गडचिरोली वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कळवण्यात आले असून वनविभागाची टीम रवाना झाली आहे.
या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सातपुते परिवाराला लवकरात लवकर आर्थिक मदत करावी.आणि या परिसरात वावरत असलेल्या वाघाचा त्वरित बंदोबस्त करून वाघाला जेरबंद करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी , व परिसरातील जनतेनी केली आहे..