पोंभूर्णा: तालुक्यातील देवाडा खुर्द येथे धान मळणी करीत असतांना अचानक थ्रेशर मशीनमध्ये दोन्ही पाय व कमरेखालचा भाग गेल्याने एका मजूराचा मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.१७ डिसेंबरला सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. नितेश बाबुराव पिपरे वय (३२) वर्ष, रा. देवाडा खुर्द असे मृतकाचे नाव आहे.
नितेश हा मजुरीसाठी पंकज देऊरमल्ले यांच्या थ्रेशर मशीनवर काम करण्यासाठी गेला होता. सकाळी ८ वाजताच्या सुमारास किरण टिकले यांच्या शेतातील धान मळणी
करीत असतांना मशीनमध्ये नितेशचे दोन्ही पाय व कमरेपर्यंतचा भाग ओढल्या गेल्याने चेंदामेंदा झाला. नितेश दोन तास थ्रेशर मशीनमध्ये फसून होता. कसे बसे त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास पोंभुर्णा पोलिस करीत आहे.