भामरागड : तालुक्यातील टेकला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये होत असलेले सिमेंट रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे केले आहेत."हि"कामे संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी व ग्रामसेवक यांच्या संगनमताने होत.असून काही कामात मोठ मोठे दगड वापरले जात आहेत. याकरिता टेकला येथील गावकऱ्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या कडे तक्रार केली.
आणि टेकला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गावातील २०२०/२०२१ ते २०२२/२०२३ या वर्षातील झालेल्या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एकीकडे शासन व प्रशासन ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य,रस्ते,पाणी,अशा मुलभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे.आणि ग्रामपंचायती कडून नित्कृष्ट दर्जाचे काम करुन पैसे लादण्याचे काम संबंधितांकडून केले जात आहे.शासन व प्रशासना कडून चांगले काम करण्याचे आदेश असुनही या ग्रामीण भागातील नागरिकांना अशाप्रकारे नित्कृष्ट दर्जाचे काम करुन दिल्या जाते शासन व प्रशासन म्हणतो की आम्ही ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्याप्रकारची सोयी सुविधा पुरविण्यात येत आहे तर अशा होणाऱ्या नित्कृष्ट दर्जाच्या कामाकडे पाहिल कोण असाही प्रश्न टेकला गावातील नागरिकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासमोर उपस्थित करून चौकशी करून करण्याची मागणी केली.
व झालेल्या कामाचे अजूनही मजुरांचे मजुरीचे पैसे मजुरांना देण्यात आले नाही काम केलेल्या मजुरांचे पैसे का अदा करण्यात आले नाही हेही टेकला येथील ग्रामसेवकास विचारणा करण्यात यावी व या अदा न केलेल्या मजूरीच्या पैसाची चौकशी करून काम करणाऱ्या मजुरांना मजुरी मिळवून देण्याचीही गावकऱ्यांनी निवेदनातून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या कडे विनंती केली आहे यावेळी टेकला गावातील .नगर पंचायत भामरागडचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती विष्णु मडावी,भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती लालसू आत्राम,पेरमिली ग्राम पंचायतचे माजी सरपंच प्रमोद आत्राम, आवीस अजय भाऊ मिञ परिवाराचे युवा कार्यकर्ते लक्ष्मीकांत बोगामि, आवीस अजय भाऊ मिञ परिवाराचे भामरागड तालुका अध्यक्ष सुधाकर तिम्मा, नरेंद्र गर्गम, सुखराम दादा,प्रभाकर मडावी, राकेश सडमेकसह गावातली महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.
चौकशी करून न्याय मिळवून देणार
आपण माझ्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार आपल्या गावात होत असलेल्या कामांची चौकशी करून खरोखरच नित्कृष्ट दर्जाचे काम केले जात असेल संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल आणि आपण केलेल्या कामाची मजुरी का अदा केली नाही याचीही चौकशी करून आपणास न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे टेकला येथील गावकऱ्यांना आपण विश्वास दिला आहे असे गडचिरोली वार्ता न्युजशी बोलताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सांगितले