ट्रेविस हेड ( Image Source : AP ) |
World Cup 2023 Final: वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना संपून दोन दिवस झाले आहेत, पण भारतीय क्रिकेट चाहते अजूनही हे मानायला तयार नाहीत आहेत की टीम इंडियाच्या हातून वर्ल्ड कप 2023 ट्रॉफी गेली आहे. यामुळेच सोशल मीडियावर असे अनेक दावे समोर येत आहेत, ज्यामध्ये टीम इंडिया वर वर्ल्ड कप फायनलमध्ये फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांचा एक भाग असे दावे खरे मानत आहेत आणि ते मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. असाच दावा रोहित शर्मा च्या विकेटशी संबंधित आहे.वास्तविक, रोहित शर्मा वर्ल्ड कप फायनल मध्ये आऊट नसल्याच्या बातम्या सोशल मीडिया, विशेषत: यूट्यूब आणि इंस्टाग्राम वरील काही अकाऊंट वरून पोस्ट करण्यात आल्या होत्या. या अहवालांमध्ये असे म्हटले आहे की ट्रॅव्हिस हेडने हा कॅच चुकवला होता परंतु मैदानापासून फोर्थ अंपायर पर्यंत कोणाचाही याकडे लक्ष गेले नाही. या रिपोर्ट्समध्ये ट्रॅव्हिस हेडचे छायाचित्रही दाखवले जात आहे, ज्यामध्ये त्याच्या हातातून चेंडू पडताना दिसत आहे. यूट्यूबचे हे व्हिडिओ आता इन्स्टा आणि फेसबुक वरून अनेक सोशल मीडिया नेटवर्कवर फिरत आहेत. पण हे खरंच खरं आहे का?
हे खरंच घडलं का?
याचे उत्तर 'नाही' असे आहे. रोहित शर्मा आऊट न झाल्याचे आणि ट्रॅव्हिस हेडने कॅच गमावल्याचे सर्व दावे चुकीचे आहेत. या कॅचचा खरा व्हिडिओ पाहिल्या नंतर हे सर्वांना स्पष्ट होईल. हा व्हिडिओ सामन्यादरम्यान अनेक वेळा दाखवण्यात आला होता, ज्यामध्ये ट्रॅव्हिस हेड स्पष्टपणे कॅच घेताना दिसत होता. वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन संघाने खेळाच्या प्रत्येक विभागात भारतावर वर्चस्व गाजवले होते, यात मतभेद नसावेत. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, फलंदाजी पासून रणनीती पर्यंत प्रत्येक विभागात ऑस्ट्रेलिया सरस होता आणि त्यामुळेच तो चॅम्पियन झाला.
मग असे दावे कशासाठी?
हे दावे फक्त लाईक्स आणि सबस्क्रिप्शन साठी केले जात आहेत. यूट्यूब वर न्यूज चॅनेलच्या नावावर अनेक बनावट अकाउंट आहेत, जे खोट्या बातम्या प्रकाशित करून आपल्या चैनलचे व्ह्यूज, लाईक्स आणि सबस्क्रिप्शन वाढविण्यासाठी करीत असतात. आता या देशात क्रिकेटची पूजा केली जात असल्याने आणि वर्ल्ड कपच्याच्या फायनल मधील भारताचा पराभव कोणीही पचवू शकत नसल्याने असे खोटे दावे करून अधिक व्ह्यूज, लाईक्स आणि सबस्क्रिप्शन गोळा करता येतील.