चामोर्शी: गेल्या काही वर्षापासून चामोर्शी जामगिरी रस्ता मंजूर असून संबंधित ठेकेदारांनी व संबंधित प्रशासनाने अर्धा काम पूर्ण करून मौजा भोगनबोडी ते मारोडा एवढा काम अपूर्ण ठेवून कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. भोगनबोडी पासून तर मारोड्या पर्यंत फक्त खड्डे बुजवण्याचा काम प्रशासनाने केला आहे.
भोगनबोडी वरून मारोडा पर्यंत रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याकडे संबंधित प्रशासनाने व संबंधित ठेकेदारांनी दुर्लक्ष केला आहे. त्यामुळे मारोडा ग्रामपंचायतचे सदस्य रोशन कोहळे यांनी येत्या पंधरा दिवसाच्या आत पूर्णपणे डांबरीकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात न केल्यास ठिय्या आंदोलन करणार अशी ग्वाही दिली आहे.. रोशन कोहळे यांनी घेतलेल्या पुढाकारात गावकऱ्यांनी समर्थन नोंदविला आहे. येत्या पंधरा दिवसाच्या आत काम न झाल्यास गावकरी व रोशन कोहळे आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे.