Nagpur Sex Racket: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अकरावीच्या विद्यार्थिनीकडून देहव्यापार; कॉलेजवयीन तरुणींची सुटका, आरोपींना अटक | Batmi Express

Nagpur Sex Racket Live Updates,Nagpur Sex Racket,nagpur news,Nagpur,Nagpur Sex Racket News,crime Nagpur,Nagpur Crime,

Nagpur Sex Racket Live Updates,Nagpur Sex Racket,nagpur news,Nagpur,Nagpur Sex Racket News,crime Nagpur,Nagpur Crime,

नागपूर : बेलतरोडीतील अथर्वनगरीतील एका सदनिकेत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा घातला. येथे अकरावीत शिकणाऱ्या मुलीकडून देहव्यापार करवून घेण्यात येत होता. या छाप्यात पती-पत्नीसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर मुलीची दलदलीतून सुटका केली. मुकेश भगवान बैसवारे (३८, रा. अथर्व नगरी क्रमांक ०१, डी विंग रूम क्र. २०४, रेवतीनगर, जयराम कॉलनी), शुभांगी मुकेश बैसवारे (३८) आणि विशाखा दिलीप मारबते (रा. वार्ड क्रमांक २, नंदा गोमुख,ता. सावनेर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के, सहायक निरीक्षक अयुब संदे यांना अथर्व नगरी क्रमांक ०१ येथे सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली. येथे अल्पवयीन मुलींना ग्राहकांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करण्यात येत होते. आरोपी मुकेश आणि पत्नी शुभांगी हे दोघेही आंबटशौकीन ग्राहक शोधत होते. त्यांना अल्पवयीन मुलींशी शारीरिक संबंधाचे आमिष दाखविण्यात येत होते. तर विशाखा मारबते ही मुलींचा शोध घेऊन देहव्यापारासाठी सदनिकेत आणत होती.

शनिवारी दुपारी गुन्हे शाखेने सदनिकेसमोर सापळा रचला. तेथे बनावट ग्राहक पाठवला असता १६ वर्षांच्या पीडित मुलीचा सौदा करण्यात आला. बनावट ग्राहकाने इशारा करताना पोलिसांनी छापा घातला. मुलीची सुटका केली तर मुकेश बैसवारे, शुभांगी आणि विशाखा मारबतेला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी बेलतरोडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.