अहेरी जवळील चींचगुंडी गुप्फा निवासी दोन तरुण अहेरी वरून एटापल्ली कडे दुचाकीने जात असताना येलचिल जवळ ट्रक सोबत टक्कर होवून सचिन पद्माकर नागुलवार,२३, याचा जागीच मृत्यू झाला. जखमी शंकर रमेश येडगम,३१, हा गंभीर जखमी असून अहेरी उपजील्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्याला पुढील उपचारासाठी रेफर करण्यात येणार आहे.
मृतकला गड अहेरी येथे किराणा दुकान असून त्याची आवक पाहिजे तेवढी नसल्याने तो ईतर कामे करायचा. त्याचे दोन वर्षापूर्वीच झाले असून त्याला एक लहान मुलगी असल्याचे कळते. जखमी हा मूळचा इंदाराम येथील असून मिस्त्रीचे काम करीत असल्याची माहिती आहे. पुढील तपास अहेरी पोलिस करीत आहेत.
नक्की वाचा
त्रिवेणी सूरजगडच्या बेशिस्त मालवाहतूक ट्रॅकमुळे आणखी किती कुटुंब उद्ध्वस्त होणार? काल एटापल्ली सूरजगड खाणीतून त्रिवेणी कंपनीच्या बेशिस्त मालवाहू ट्रकने आणखी एका बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त केले. येलचिल - अल्लापल्ली रोडवर त्रिवेणी कंपनीच्या खाजगी मालवाहू ट्रकने आज आणखी 1 तरुणांचा बळी घेतला. येणापूर येथे गेल्या दिवशी दोन जणांचा चिरडून मृत्यू झाला. मालवाहनांच्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे ट्रॅक्टर अनियंत्रितपणे धावू लागले. स्थानिक सामान्य लोक दररोज आपला जीव गमावत आहेत.
अजून किती जीव घेईल? आणि माघारी फिरणाऱ्या किती कुटुंबांना आपला जीव गमवावा लागेल? कंपनीचे अधिकारी आणि त्यांची वाहने बेशिस्त का होत आहेत? कंपनीच्या वाईट प्रभावाचा परिणाम जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांवर झाला आहे का? जिल्ह्यातील बेरोजगारांना काम देण्याऐवजी राज्याबाहेरील लोकांना काम देणे हा मूर्खपणा आहे का? शेवटी ती सामान्य जनतेला आणखी किती फसवणार? किती दिवस लोकलला हमाल आणि बाहेरच्याला बाबू म्हणणार? बाहेरील लोकांना कोट्यवधींची भरपाई आणि सर्वसामान्य नागरिकाच्या मृत्यूवर 3 ते 5 लाख रुपये देऊन कंपनी किती दिवस कंपनीच्या कामगारांची फसवणूक करत राहणार? जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आता तरी जागे व्हावे लागेल, अन्यथा लोकप्रतिनिधी व कंपनी उद्योगपतींची फसवणूक करण्याचा हाच जुना खेळ सुरू राहणार? - ज्ञानेंद्र विश्वास