सिंदेवाही: अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त | Batmi Express

Be
0

Sindewahi,Sindewahi News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Today,Chandrapur Live,

सिंदेवाही (Sindewahi) : 
तहसील कार्यालय सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या परिसरात सर्रास अवैध गौणखनिजाचे उत्खनन करुन शहरात वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करून सिंदेवाही तहसील कार्यालय येथे लावण्यात आले असल्याने गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सिंदेवाही तालुका हा गौण खनिज साठी प्रसिद्ध असून येथे अनेक तस्कर महसूल विभागाला हुलकावणी देऊन गौण खनिजाची तस्करी करीत असतात. या तालुक्याला मागील सहा महिन्यात सहा तहसीलदार लाभले असल्याने कोणतेही अधिकारी गौण खनिज चोरी वर आळा घालू शकले नाही. दरम्यान बुधवारी दुपारी ४ वाजता अवैध्य मुरूमाचा ट्रॅक्टर नवरगाव रोड कडून येत असल्याचे  माहिती महसूल विभागाला मिळताच सिंदेवाही चे नायब तहसीलदार मंगेश तुमराम यांनी  शहरातील शिवाजी चौक येथे सदर ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टरची चौकशी केली असता ट्रॅक्टर मध्ये मुरूम असल्याचे निदर्शनास आले.

सदर वाहनाचे क्रमांक -MH ३४, BF ३४५४ असून मुरूम वाहतूक करणारी ट्राली विना क्रमांकाची आहे.तसेच वाहन चालकाकडे गौण खणीजाची कसल्याही प्रकारचा वाहतूकीचा परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे वरील क्रमांकाचे ट्रॅक्टर तहसील कार्यालय येथे आणून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सिंदेवाहीचे  तहसीलदार संदीप पानमंद यांचा मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार  मंगेश तुमराम यांनी केली आहे. या कारवाईने सिंदेवाही तालुक्यातील अवैध गौणखनिज उत्खनन करून तस्करी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->