Ballarpur Murder: शहरात युवकाची हत्या | Batmi Express

Ballarpur Murder,Ballarpur,Ballarpur News,Chandrapur,Chandrapur Murder,Chandrapur Crime,Chandrapur News,

Ballarpur Murder,Ballarpur,Ballarpur News,Chandrapur,Chandrapur Murder,Chandrapur Crime,Chandrapur News,

बल्लारपूर : शहरातील विद्या नगर वॉर्ड येथील पंचशील चौक येथे रात्रौ साडे दहा च्या सुमारास उधारीचे पैसे मागितले म्हणून झालेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या दोघा पैकी एकाची हत्या करण्यात असून एक गंभीर जखमी झाला आहे. हत्या करणारे दोन महिलांसह पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हत्या झालेल्या युवकांचे नाव ललित तोडसाम (३७) रा.पंचशील चौक, विद्या नगर वार्ड आहे. 

माहितीनुसार, चैतन्य समुद्रवार याची बहीण आकांक्षा हिने आरोपी शितल रितीक गवई ला काही दिवसा अगोदर उसनेवारी ने पैसे दिले होते. पैसे वापस करण्याची वेळ दिल्यानंतर ही पैसे परत नाही केल्याने आरोपी शितल ला पैसे वापस मागितले. त्यात शिवीगाळ करीत वाद झाला. शितल चा पती रितीक गवई याने पैसे मागितले म्हणून अश्लील शिवीगाळ करीत झटापट करीत असल्याने मृतक ललित तोडसाम व जखमी अमोल देवगडे यांनी शितल चा पती रितीक गवई याला समजवून घरी पाठविले. रितीक ने त्याची आई आशा गवई हिला वाद झाल्याचे सांगितले तेव्हा आशा गवई हिने शेजारी राहणाऱ्या सौरभ खान याला घेऊन घटनास्थळी पोहचले व तुम्ही रितीक ला का मारले असे म्हणून पाचही आरोपीने संगमात करून काठी, दगड, नालीचे सिमेंट चे तुकडे यांनी मारले. हाणामारीत मधात सोडवण्यासाठी गेलेल्या ललित तोडसाम याचा मृत्यू झाला आणि अमोल देवगडे हा जखमी झाला असून त्याच्यावर चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. करण्यात आले. 

यात मध्यस्थी गेलेला युवकाचा जीव गेला असून आरोपी  रितीक भीमराव गवई (२२), सौरभ खान हाजी अब्दुल सुभान खान (३५), आशा भीमराव गवई (४५), शितल रितीक गवई (२०) सर्व राहणार ग्रामीण रुग्णालय चे मागे, शांती नगर, बालाजी वॉर्ड बल्लारपूर, बंडू पांडुरंग नगराळे (४७) रा. पंचशील चौक विद्या नगर वॉर्ड बल्लारपूर सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले. 

पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.