मंडई पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग करुन टवाळखोरांनी केली बेदम मारहाण | Batmi Express

torture,Molested,Bhandara,Gondia Crime,Bhandara News,Bhandara Crime,

torture,Molested,Bhandara,Gondia Crime,Bhandara News,Bhandara Crime,

भंडारा :- गावातच मंडई बघण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय तरुणीचा १५ ते १७ टवाळखोरांनी विनयभंग केला. एवढेच नाही तर टवाळखोरांनी तिला बेदम मारहाणही केली. हा गंभीर प्रकार बेटाळा येथे उघडकीस आला. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी आठ तरुणांविरूद्ध गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

गावात मंडई असल्याने आतेभावासोबत रात्री ही पीडित तरुणी मंडई बघण्यासाठी गेली होती. तरुणी व तिचा आतेभाऊ रस्त्यावर उभे असताना १५ ते १७ तरुण त्यांच्याजवळ आले व त्यांनी तरुणीचा विनयभंग केला. यानंतर तरुणांनी दोघांनाही काठीने बेदम मारहाण केली. यात ती गंभीररित्या जखमी झाली आहे. पीडितेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिमान चैताराम ठोंबरे (३२), कार्तिक जयराम ठोंबरे (२०), गोलू रामभाऊ ठोंबरे (२८), गौरव अशोक समृत (२०), विकी रामजी देशमुख (२४), विनोद साकुरे (२४), कैलास देशमुख (२८), शोभाराम साकुरे (३३) या ८ जणांना ताब्यात घेतले आहे. पुन्हा काही समाविष्ट आहेत काय याचा तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.