फोटो न्यूज दर्शवीत आहे |
वडसा : शहरातील न्यू आदर्श स्कूल इंग्लिश स्कूलमध्ये (New Adarsh School English School) शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनी ३ ऑक्टोबरला अचानक बेपत्ता झाल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दोघीही दुपारच्या मधल्या सुटीत (mid-afternoon break) गायब झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बेपत्ता मुलींचे वय अनुक्रमे १६ व १३ आहे. एक दहावीत रेशमा धोटे (16) तर दुसरी कांचन वंजारी (13) सातवीत शिकते.
३ ऑक्टोबरला नित्याप्रमाणे त्या शाळेत गेल्या; मात्र मधल्या सुटीत दुपारी १ वाजेपासून सायंकाळपर्यंत त्या घरी परतल्याच नाहीत. कुटुंबीयांनी शाळेत, मैत्रिणींकडे शोधाशोध घेतली नातेवाईकांकडेही विचारपूस केली पण त्यांचा थांगपत्ता लागला नाही. सदर दोन्हीं मुली भगतसिंग वॉर्डातील आहेत.
याबाबत देसाईगंज ठाण्यात अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू असल्याचे पो.नि. किरण रासकर यांनी सांगितले.
सीसीटीव्हीत (CCTV) दृश्य कैद
दरम्यान, दुपारी १ वाजता शाळेत मुलांना सुटी दिली जाते. या सुटीत दोघीही एकामागोमाग एक शाळेतून बाहेर पडल्या. त्यानंतर त्या कोठे गेल्या, याचे रहस्य कायम आहे. शाळेतून बाहेर पडतानाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यांना शोधण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेपुढे आहे