नागभिड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या वाचनातून ज्ञानामृत मिळावे आणि हेच गाव खेड्यातील मुलं जगाच्या स्पर्धेत उतरावे या उद्देशाने नागभीड तालुक्यातील किरमिटी येथील ग्रामपंचायतच्या पुढाकारातून सार्वजनिक अभ्यासिका केंद्राचा उद्घाटन सोहळा जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात नुकताच पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे, तर अध्यक्ष म्हणून सरपंच ईश्वर लोणारे, प्रमुख पाहुणे मुख्याध्यापिका नागदेवते , ग्रामसेवक नंदू मुळनकर, उपसरपंच राजकुमार दडमल, ग्रा.पं. सदस्य सुरज चौधरी, जि.प.शाळेचे शिक्षक व अंगणवाडी सेविका व ग्राम पंचायतचे कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.
दरम्यान कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन करतांना गावातील युवांनी अभ्यासिका सातत्याने सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहून स्वतःच्या नावासोबतच गावाचे नाव लौकिक करावे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक नंदू मुळनकर यांनी केले तर आभार सुरज चौधरी यांनी मानले.