Korchi Murder: अनैतिक संबंधातून सहकाऱ्यांसह पत्नीने केली पतीची हत्या | Batmi Express

Kurkheda Crime,Gadchiroli News,kurkheda live,Gadchiroli,Kurkheda News,Gadchiroli Crime,kurkheda,Gadchiroli Batmya,murder,Murdered,Korchi,

Kurkheda Crime,Gadchiroli News,kurkheda live,Gadchiroli,Kurkheda News,Gadchiroli Crime,kurkheda,Gadchiroli Batmya,murder,Murdered,Korchi,

ता.प्र / कुरखेडा- कोरची, 14 ऑक्टोबर : कोरची तालुक्यातील पोमके बेडगाव अंतर्गत येत असलेल्या दवंडी येथे 12 ऑक्टोबर रोजी लखन सोनार (अंदाजे वय 32) याची गळा चिरुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र यातील आरोपी कोण याचा शोध पोलीस करीत होते. मात्र या हत्येतील आरोपींचा शोध लागला आहे. पत्नीचा या हत्येमध्ये समावेश असून पत्नीचे इतर एका इसमासोबत अनैतिक संबंध असल्याने हा हत्येचा कट रचण्यात आला होता अशी माहीती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी बळीराम गावडे रा. कुकडेल, सहकारी सुभाष नंदेश्वर रा. दवंडी व पत्नी सरीता सोनार यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान हत्या केल्यानंतर पत्नी सरीताने पोलिसांना सांगितले कि, आम्ही सर्व रात्रीच्या सुमारास झोपून असताना रात्री 11 वाजताच्या सुमारास अचानक दरवाजा ठोठावला. दरवाज उघडला असता पाच ते सहा च्या संख्येत काळे कपडे परिधान केलेले अज्ञात इसम घरात शिरले व आरडाओरड करुन नये म्हणून चाकूचा धाक दाखवत पती लखन ची गळा चिरुन हत्या केली. याबाबत पोलिसांनी अधिक तपास केल्याने संशयाची सुई पत्नीकडे भिरकल्याने तपासाची चक्रे अधिक गतीने फिरवित सखोल तपासादरम्यान पत्नीने घटनाक्रमाचा बनाव केल्याचे लक्षात आले. दरम्यान पत्नी सरिताचे हिचे दवंडी येथील सुभाष नंदेश्वर या इसमासोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन पती- पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असल्याची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे तपासाची दिशा ठरवत सरिताकडे अधिक विचारपुस करण्यात आली असता सुरुवातीला तिच्याकडुन उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन विचारपुस केली असता, तिने प्रियकर व त्याच्या साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.