चंद्रपूर : दारूच्या नशेत असलेल्या युवकांच्या टोळीने एका गर्भवती महिलेला मारहाण केल्याचा धक्कादायक घटना मूल येथे शनिवारी रात्री घडली आहे. दरम्यान महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांना मिळताच त्यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन महिलेची विचारपूस केली तसेच मूल पोलिसांनी आरोपी युवकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
मूल शहरात शनिवारी रात्री गणेश विसर्जन होते, दरम्यान त्याच परिसरात राहणारे बोर्डावार यांनी पत्नी गर्भवती आहे. कृपया आवाज करू नका अशी विनंती केली मात्र युवक दारूच्या नशेत असल्याने त्यांनी बोर्डावार यांना मारहाण केली. त्यानंतर पतीचा बचाव करण्यासाठी गेलेल्या गर्भवती महिलेला सुद्धा युवकांच्या टोळीने मारहाण केली. त्यानंतर मूल पोलिसात तक्रार करण्यासाठी गेलेल्या बोर्डावार यांना आधी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले.
सदर घटना अत्यंत घृणास्पद व दुर्दैवी असून दारूच्या नशेत गर्भवती महिलेला मारहाण करणाऱ्या आरोपी युवकांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे व आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राजू झोडे, आकाश बोर्डावार, विवेक मुत्यलवार, सचिन बोर्डावार, सुरेश फुलझले, गौरव पिलरवार, वैभव कोमलवार, आकाश कावळे, राकेश गुरनुले, विकास बोर्डावार, चिकू निकोडे, मंगेश नेताम, उज्वल निकुरे यांनी केली आहे.