गडचिरोली: कोरची जिल्हा परिषद कार्यालय उपविभाग वाऱ्यावर; कार्यालयीन वेळेनंतरही अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित | Batmi Express

BE PLUS Publisher
0

Gadchiroli,Gadchiroli Live News,Korchi,Gadchiroli Batmya,

कोरची
: कोरची येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय कार्यालयीन वेळेनंतर उशिरा उघडतो. ०९ ऑक्टोबर सोमवारी सकाळी ११ वाजे पर्यंत सदर कार्यालय बंद असून हे कार्यालय ११:१५ वाजतानंतर उघडण्यात आले. येथील कार्यरत अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसून कुरखेड्यावरूनच अपडाऊन करतात  आणि येथील विभागचा कामकाज सांभाळत आहेत. कर्मचारी अनुपस्थित राहत असल्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय सध्या वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे.

सदर कार्यालय उघडल्यानंतर येथे अधिकारी व कर्मचारी आपल्या मन मर्जीने कधी येतात तर कधी दिवसभर गैरहजर राहत असल्याचीही माहिती पुढे आली आहे. सदर कार्यालयातील फलकावर अध्यादेश 2005 प्रशासकीय माहिती अधिकारी अपिलीय अधिकारी यांच्या पद निदर्शित तक्त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग वरिष्ठ सहाय्यक डी. आर. सोलंकी, शाखा अभियंता व्ही. एम. मडावी, सहाय्यक अभियंता श्रेणी एक बी. सी. धार्मिक यांच्यासह कार्यालयात अंदाजे १५ कर्मचाऱ्यांची संख्या असून फक्त एक परिचर उपस्थित राहत आहे. सदर कार्यालय उशिरा उघडल्यापासून परिचर दिवसभर बसून ५ वाजता कार्यालय बंद करून निघून जातो. येथील कार्यालयात कामानिमित्त बाहेर गावून आलेल्या काही नागरिकांना ०९ ऑक्टोबर सोमवारी परिचर सोडून सर्व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले तर कार्यालयातील विविध विभागातील कर्मचारीच्या खुर्च्या खाली असून टेबलावर फक्त फाईली ठेवून होत्या.

अधिकारी व कर्मचारी अनउपस्थित राहत असतील तर तालुक्याचा विकास कसा होणार असा सवाल येथील नागरिक करीत आहेत तालुक्यातील आदिवासी भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कोरचीत जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु कार्यालयात होणारी कामे कुरखेडा वरूनच केली जात असेल तर तालुक्याच विकास कसा होणार. बांधकाम कार्यालयात अभियंत्यांचा नावाचा नाम फलक फक्त शोभेसाठीच लावला आहे मात्र ते कधीही या कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची अनेकदा नागरिकाकडून ओरड होत असून त्याबाबत काहीही उपाययोजना करण्यात आलेले नाही त्यामुळे तालुक्यातील कामे कशी होणार अशी ओरड नागरिकांकडून करण्यात येत आहे.

          यासंदर्भात जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सहाय्यक अभियंता बी सी धार्मिक यांना फोनवरून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मी शासकीय कामानी सोमवारी नागपूरला गेलो होतो तर कार्यालयातील कर्मचारी कामामधील व्हिजिट किंवा सर्वे करण्यासाठी बाहेर गेले असतील. तसेच कार्यालय दररोज वेळेवरच उघडतो असे त्यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->