वडसा: वाघाच्या हल्ल्यात फरी येथील महिला ठार | Batmi Express

Gadchiroli News,wadsa,Desaiganj News,Gadchiroli,Gadchiroli Tiger Attack,Wadsa News,Tiger Attack,Desaiganj,

Gadchiroli News,wadsa,Desaiganj News,Gadchiroli,Gadchiroli Tiger Attack,Wadsa News,Tiger Attack,Desaiganj,


वडसा/देसाईगंज :-  तालुक्यातील फरी येथील शिवराज-फरी मार्गावर फरी तलावाच्या विरुद्ध बाजूला असलेल्या झुडपी जंगलालगत असणाऱ्या स्वतःच्या शेतावर गवत घेत असतांना महानंदा दिनेश मोहुर्ले यांची पट्टेदार वाघाने हल्ला करुन केले ठार झाल्याची घटना आज ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. 

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव महानंदा दिनेश मोहुर्ले असून वय अंदाजे ५० वर्षे आहे.हल्ली शेतातील निंदणी सुरू आहे.तसेच पाऊस पडल्याने पाणी करण्यासाठी व इतर शेतातील कामे करण्यासाठी अनेक शेतकरी बांधव सकाळच्या सुमारास शेतावर जात असतात.अशातच काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यातील काही गावांमध्ये वाघांची दहशत कमी झाली असल्याने अनेक नागरिक सुखावले होते.मात्र आज ९ वाजेच्या सुमारास फरी येथील महिला शेतामध्ये काम करत असतांना वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.वन विभागाने वाघांचा बंदोबस्त करावा; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.