नागरिकांना करता येईल ऑनलाईन नोंदणी
उद्दिष्टांच्या 37 टक्के कार्ड तयार
भंडारा, दि.7 : जिल्हयात प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहा लाख 18 हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाली असुन याच्या यादया सर्व शासकीय आरोग्य केंद्रावर उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे. यानुसार या लाभार्थ्यांना 'आयुष्मान कार्ड'चे वितरण होणार असून वर्षभरात पाच लाखांपर्यंत वैद्यकीय उपचाराचा लाभ त्यांना घेता येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.
जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत ‘आयुष्मान भव' मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची अंमलबजावणी करताना सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवा, अशी सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयुष्यमान भव योजनेचा आढावा त्यांनी घेतला. याव सिंगल युज प्लास्टीक वापरणा-यांना होणार दंड जिल्हाधिका-यांनी दिले निर्देश.