Breaking! दारू बंदी असतानाही दारू वाहतूक, दोघांना तीन वर्षांची शिक्षा | Batmi Express

Be
0

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,

गडचिरोली : जिल्ह्यात दारू बंदी असतानाही शहरात दारूची वाहतूक करताना आढळलेल्या दोन आरोपींना ६ सप्टेंबरला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. खामतकर यांनी तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

अरुण पिसाराम मस्के (३०, रा. सिल्ली ता. भंडारा). अर्जुन अरुण शील (३०, रा. गोकुळनगर, गडचिरोली) अशी त्या आरोपींची नावे आहेत. ८ मार्च २०२० रोजी गोकुळनगर परिसरात वाहनातून घरपोहोच दारू पुरवठा करताना ते दोघे आढळून आले होते. तत्कालीन उपनिरीक्षक भागवत कदम यांनी

सापळा रचून त्यांना पकडले होते. त्यांच्याकडून दारूही जप्त केली होती. सहायक उपनिरीक्षक मुनेश्वर मेश्राम यांनी तपास करून दोषारोपपत्र येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सादर केले. न्या. आर. आर. खामतकर यांनी साक्षीपुरावे तपासून दोन्ही आरोपींना दोषी ठरवले, त्यांना प्रत्येकी तीन वर्षे शिक्षा सुनावली. मस्के यास ५१ हजारांचा तर शील यास ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. विशेष सरकारी अभियोक्ता बी. के. खोब्रागडे यांनी सरकारतर्फे बाजू मांडली. हवालदार दिनकर मेश्राम, श्रीराम करकाडे, हेमराज बोधनकर, सोनी तावडे यांनी पैरवी म्हणून साहाय्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->