व्हाट्सएप ग्रुपवर महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा; ग्रुप सदस्यांची कोरची पोलीसात तक्रार | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli Live News,Korchi,Gadchiroli Batmya,

 

Gadchiroli,Gadchiroli Live News,Korchi,Gadchiroli Batmya,

कोरची: कोरची येथिल प्रसिद्ध असलेल कोरची समाचार व्हाट्सएप ग्रुप २०१५ पासून कार्यरत आहे. या ग्रुपमध्ये शासकीय, प्रशासकीय, व्यापारी व राजनीतीशी संबंधीत अनेक व्यक्ति व नेते आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून तालुक्यातील समस्या, बातम्या, सामाजिक कार्यक्रम असे अनेक प्रकारचे संदेश व मॅसेज, व्हिडीओ पाठविले जातात. सदर ग्रुपच्या माध्यमातून वाचकांना अनेक बाबी अभ्यासायला मिळतात. पण सध्या या ग्रुपमधिल काही सदस्य जाणून व ग्रुपच्या माध्यमातून महापुरुषांची बदनामी करू पाहत आहेत. ज्या महापुरुषांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहूती दिली, ज्यांनी न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष केला, ज्यांनी देशाच्या प्रगतीत खुप मोठे योगदान दिले, अशा महापुरुषांची हेतू पूर्वक बदनामी होईल असे मॅसेज त्यांच्याकडून हेतुपरस्पर कोरची समाचार ग्रुपमध्ये शेयर केले जात आहेत.

       काही दिवसानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती असून महात्मा गांधींना साऱ्या विश्वात मानाचा दर्जा आहे. पण काही विकृत प्रवृत्तीचे बांधव राष्ट्रपित्यांप्रती असलेले प्रेम विभागले जाऊन सामाजीक सलोखा बिघडला जावा या उद्देशाने खोटी पोस्ट तयार करून सामान्य जनमानसात वैर निर्माण व्हावा या उद्देशाने ती पोस्ट पसरवली जात आहे. प्रत्येक स्वतंत्रता सेनानींचे महत्व वेगवेगळे असून त्यांची तुलना करणे अशक्य आहे. अशा परिस्तिथीत वादग्रस्त आणि माहितीचा अभाव असणारी पोस्ट टाकणे म्हणजे सामान्य जनमानसाला भरकटवणे होय. 

        यावर कोरची पोलीस अधिकारी लक्ष देऊन महापुरुषांची फेक न्युजच्या माध्यमातून बदनामी करणाऱ्या ग्रुप सदस्यांवरती कारवाई करावी. तसेच सदर ग्रुपवरती पोलीस विभागाच्या वतीने जबाबदारीने नजर ठेवण्यात यावी व महापुरुषांची होणारी बदनामी थांबवावी. असे निवेदनाद्वारे लेखी तक्रार कोरची येथील पोलीस अधिकारी यांना ग्रुप च्या सदस्यांच्या वतीने देण्यात आले. निवेदन देते वेळेस कोरची सामाजिक कार्यकर्ते अविनाश हुमणे, सिद्धार्थ राऊत, स्वप्निल कराडे, प्रशांत कराडे, चंद्रशेखर वालदे, आकाश साखरे व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.