अष्टविनायक बाल गणेश मंडळ सुरबोडी, यांनी श्रमदान करून बुजवीले ब्रम्हपुरी वडसा महामार्गावरील खड्डे
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी ते वडसा राज्य महामार्गावर असून अनेक महिन्यापासून या रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत. सुरबोडी ते पेपर मील चौक पर्यंत मोठमोठे खड्डे आहेत. या खड्ड्यात अनेक वाहन चालकांचा अपघात होऊन गंभीर स्वरूपात जखमी होत आहेत. या राज्य महामार्गाने हजारो प्रवासी प्रवास करत असतात. अचानक पुढे धोकादायक खड्डा लक्षात येत नसल्याने अचानक बेधडक खड्ड्यात प्रवासी पडुन जखमी होत आहेत. पण याकडे बांधकाम विभागाने पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. बांधकाम विभाग एखाद्या चा जीव गेल्यानंतर लक्ष देणार आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुरबोडी येथील अष्टविनायक बाल गणेश मंडळ युवकांनी एक आदर्श निर्माण करत स्वखर्चाने व श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. या अष्टविनायक बाल गणेश मंडळ सुरबोडी येथील युवकांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.
ब्रम्हपुरी ते वडसा महामार्गावर सुरबोड़ी पासुन हरदोली पर्यंत अपघाताला आमंत्रण देणारे मोठमोठी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात रोज महिला, पुरूष प्रवासी जखमी होत आहेत. पण कोणत्याही प्रकारे सदर समस्या कडे लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही. सुरबोडी येथील युवक रोज चार पाच खड्ड्यात पडलेल्या जखमी नागरीकांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम येथील युवक करत आहेत. पण या होणाऱ्या अपघाताकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने येथील अष्टविनायक बाल गणेश मंडळाचे युवकांनी मनात एक संकल्प करून स्वखर्चाने व श्रमदान करून संबधित विभागाला व लोकप्रतिनिधी यांना एक संदेश दिला आहे. जर आपण निवडून दीले लोकप्रतिनिधी व प्रशासन आपले काम योग्य रित्या केले तर अशा प्रकारे युवकांना पुढाकार घेऊन महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी पुढे यावे लागणार नाही. अपघात होऊन कोणालाही जीव गमवावा लागेल नाही. पण निवडणुकीत अनेक आश्वासन देऊन जातात. पण नंतर त्यांना विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अष्टविनायक बाल गणेश मंडळ सुरबोडी येथील युवकांनी आदर्श निर्माण केला:
अष्टविनायक बाल गणेश मंडळ सुरबोडी येथील युवकांनी गणेश उत्सव हा फक्त उत्सव म्हणून नाही अशा मंडळाने समाजहिताचे काम सुध्दा केले पाहिजे. तर आपल्या गणेश उत्सव करण्याचे सार्थक आहे असे मत येथील युवकांनी मांडले. यावेळी सुरज नाकतोडे, सोनु ढोरे, विलास दोनाडकर, देविदास ठाकरे माजी उपसरपंच, आदेश कामडी, सचिन राऊत, दर्शन कामडी, वैभव कवासे, विशाल डोलारे, ओमकार राऊत, भुपेश कामडी, समीर मेश्राम, दिप कामडी, सुखदेव राऊत, दिपक मेश्राम, दिक्षांत मुडले, सुरज रोखड़े आदींनी सहकार्य केले.