सरकारी कर्मचाऱ्याला शिवीगाळ म्हणजे कामकाजात अडथळा नव्हे - मुंबई सत्र न्यायालय | Batmi Express

Mumbai,live mumbai news,latest mumbai news,Mumbai News,Mumbai Today,

Mumbai,live mumbai news,latest mumbai news,Mumbai News,Mumbai Today,

मुंबई
: सरकारी कर्मचाऱ्याला केवळ शिवीगाळ करणे हा शासकीय कामकाजात अडथळ होऊ शकत नाही. तो गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई सत्र न्यायालयाने दिला. याप्रकरणी धर्मेंद्र सिंग आणि संजय दुबे या संशयितांना दोषमुक्त करण्यात आले आहे.सांताक्रूझ रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीवर रांगेत उभ्या राहिलेल्या प्रवाशांना त्रास दिल्याप्रकरणी धर्मेंद्र आणि संजय यांना आरपीएफ जवान नंदलाल शर्मा व त्यांचे सहकार जुबेर शेख यांनी समजावण्याचा प्रयत्न केला.

यावर त्यांनी जवानांना शिवीगाळ केली. याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यातून दोन्ही संशयितांची सात वर्षांनंतर सबळपुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. पी. मेहता यांनी हा निकाल दिला.

७ जून २०१४ रोजी याप्रकरणी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.