आरमोरी : आरमोरी तालुक्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहारा टी पॉइंट जवळील झुडपी जंगल खोलबोडी परिसरात आरमोरी पोलिसांच्या आशीर्वादाने दारू विक्री जोमात सुरू आहे. मात्र पोलीस प्रशासन कोमात गेले की काय असा प्रश्न आता परिसरातील सुज्ञ नागरिकाकडून उपस्थित होतांना एकाव्यास मिळत आहे. लोहारा परिसरात बऱ्याच दिवसापासून दारू विक्रीला उत आलेला आहे. यामुळे कित्येक गोरगरीब दारूच्या व्यसनामध्ये तल्लीन झाल्याचे पहावयास मिळत आहे. कितेकाचे संसार या दारूमुळे उध्वस्त झाले आहे तर काही लोकांचे तर दारू पीण्यामध्ये तल्लीन राहत असल्याने रस्त्यावर परिसरात अपघात होऊन जीव सुद्धा गेले आहेत.
हे देखील वाचा:
|ब्रम्हपुरी: एका तरुणाला वाहतूक पोलिसांकडून भर चौकात मारहाण तर दुचाकीची चावी काढली
दारूमुळे परिसरातील युवक वर्ग शालेय विद्यार्थी सुद्धा या वेसणाकडे वडल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र आरमोरी पोलीस या गंभीर बाबीकडे का म्हणून दुर्लक्ष करतात असा प्रश्न सामान्य जनतेला पडत असल्याचे दिसून येत आहे . दारू विक्री करणारे मालामाल आणि पिणारे कंगाल होऊन आपला संसाराची धुळधाणी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. गडचिरोली पोलीस अधीक्षक यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन दारूच्या वेसनामध्ये भरकटलेल्या तरुण युवकांना दारूच्या वेसणापासून थांबबावे आणि पोलीस यंत्रणा कार्यान्वित करून होणारी दारू विक्री बंद करावी असे सुद्धा परिसरातील महिला भगिनी यांच्याकडून बोलले जात आहे .