कुरखेडा : 11 ऑगस्ट : तालुका मुख्यलयापासून जवळच असलेल्या गावातील (गावाचे नाव गुप्त) एका विवाहीत गर्भवती महिलेवर दोन नराधमांनी सामूहिक दुष्कर्म केल्याची घटना गुरुवार 10 ऑगस्ट रोजी 8.30 वाजताच्या सुमारास घडल्याचे उघडकी आले आहे. याप्रकरणी कुरखेडा पोलिसांनी आरोपी ताराचंद कपूरडेरीया (30) व संजय कपूरडेरीया (32) या दोघांना अटक केली आहे. या विकृत घटनेने परीसरात खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर पीडित महिला हि 8 महिन्याची गर्भवती असल्याने बाळंतपण करिता आपल्या माहेरी आलेली होती असे कळते. दरम्यान कूटूंबातील सर्व मंडळी शेतावर गेल्याची संधी साधत शेजारी राहणाऱ्या दोन सख्ख्या भावानी महिलेवर अत्याचार केले. पिडीत महिलेने कुरखेडा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करताच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत ठाणेदार संदीप पाटील यांनी रात्रीच घटणास्थळ गाठत गावातून दोन्ही आरोपीना अटक केली व त्यांचा विरोधात भादंवि 376, 376 (ड) अन्वये गुन्हा दाखल केला.
हे देखील वाचा: