दुःखद वार्ता: ब्रम्हपुरी / सुरबोडी
- आठवड्या अगोदर आईचा मृत्यू त्या पाठोपाठ मुलाचाही मृत्यू
ब्रह्मपुरी: तालुक्यातील सुरबोडी गावातील तरुण युवक तेलंगणा राज्यात कामासाठी गेला असता कामात मग्न असतांना अचानक विद्युत करंट लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना ९ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास तेलंगणा राज्यात घडली. सुरज प्रकाश ठेंगरी वय (२८) वर्ष राहणार सुरबोडी असे मृतक युवकाचे नाव आहे.
हे देखील वाचा:
|पाथरी-पालेबारसा रोड वर दोन दुचाकीची धडक; 1 जागीच ठार तर 3 गंभीर जखमी
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, गेल्या ३ ऑगस्ट रोजी २०२३ ला मृतक सुरज ठेंगरी यांची आई लिलाबाई ठेंगरी यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यावेळी सुरज हा तेलंगणा राज्यात कामावरच होता. आईच्या निधनाची बातमी कळताच आईच्या अंत्यविधीसाठी तो सुरबोडी गावात आला होता. मात्र आठवडा-उलटला नंतर तो पुन्हा तेलंगणा राज्यात कामाच्या शोधात गेला. कामात मग्न असतांना अचानक विद्युत करंट लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे बातमी सायंकाळी 4 वाजतच्या सुमारास कुटुंबाला मिळाली असून सुरज हा घरचा करता पुरुष असल्याने त्याच्या मृत्युने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. तेलंगणा राज्यातुन मृतदेह सुरबोडी गावात आणण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात एक भाऊ दोन बहीण व वडील असा आप्त परिवार आहे. त्याच्या अश्या मृत्यूने गावातिल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून ठेंगरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.
हे देखील वाचा: