Independence Day Excellence: स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार | Batmi Express

Independence Day Excellence,Bhandara,Bhandara Live,Bhandara Today,Bhandara Batmya,Bhandara News,
Independence Day Excellence,Bhandara,Bhandara Live,Bhandara Today,Bhandara Batmya,Bhandara News,

भंडारा दि.15:
पोलीस कवायत मैदानावर आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या मुख्य कार्यक्रमानंतर करण्यात आला. यावेळी पोलीस अधिक्षक लोहीत मतानी यांच्यासह प्रशासनातील सर्व वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी सहायक शिक्षीका मंजुषा नंदेश्वर,बाळासाहेब मुंडे यांना प्रमाणपत्र देण्यात आले. शिष्यवृत्ती परिक्षेतील गुणवंत विद्यार्थी कर्तव्य सपाटे यालाही सन्मानित करण्यात आले. रानभाजी महोत्सव पाककला स्पर्धेतील यामध्ये प्रथम क्रमांक पुष्पा नागोसे, तर मंगला डहाके, नगीना बनसोड यांनाही सन्मानित करण्यात आले. (Independence Day Excellence) (Bhandara Independence Day Excellence)

हे देखील वाचा:


सैनिक कल्याण कार्यालयातर्फे शहीद वारसांना आर्थिक मदत-
शहीद नायक चंद्रशेखर भोंडे हे कर्तव्यावर असतांना शहीद झाले. त्यांना आर्थिक मदतीचा धनादेश म्हणून त्यांच्या पत्नी व माता पित्यांना 60 लाखाचे धनादेश, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, ताम्रपट देऊन कुंटुबियांचा सन्मान करण्यात आला.
तर ऑपरेशान रक्षक दरम्यान कर्तव्यावर शहीद झालेले नायक सागर खंडाईत यांच्या कुटुंबियांना ही 60 लाखाचे धनादेश, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, ताम्रपट देऊन कुंटुबियांचा सन्मान करण्यात आला. तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त 26 जुलै रोजी कारगील विजय दिवसानिमीत्त वृक्षारोपणात प्रथम क्रमांक आलेल्या पूर्व सैनिक बहुद्देशीय संस्था, ठाणा व माजी सैनिक बहुद्देशीय संस्था, पवनी यांना अनुक्रमे 20 हजार व 10 हजाराचे धनादेश देण्यात आले. तसेच आवास योजनेतील उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना ही सन्मानित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.