मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, मृतक गोपाल हा आपल्या भाऊजी यशवंत अरुण ठेंगरी रा. कुर्झा वार्ड ब्रम्हपुरी यांचे समवेत काही मुलांसोबत अधिक मासाची पूजा विसर्जन करण्याकरिता दि.१६ ऑगष्ट ला सकाळी ६ च्या सुमारास भालेश्वर येथील वैनगंगा नदीपात्रात आले होते. विधिवत पूजा झाल्यानंतर मृतक गोपाल अंघोळीला गेला असता नदीपात्रातील अंदाज न आल्याने नदीत बुडाला असून बाहेर न निघाल्याने याची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली मात्र २ तासाच्या शोधमोहिमेनंतर युवकाचा शोध लागला नव्हता त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण केल्यानंतर उशीरा युवकाचा शोध लागला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुधाकर आंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हपुरी पोलीस करत आहेत.
ब्रम्हपुरी: वैनगंगा नदीत आंघोळ करणे जीवावर बेतले | Batmi Express
Bramhapuri,Bramhapuri News,Chandrapur News,Chandrapur,Drowned,Chandrapur Live,Bramhapuri Today,Chandrapur News IN Marathi,