नागपूर : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय कार्यालयाच्या वतीने नागपूर विभागातील इच्छुक बेरोजगार युवक युवतींसाठी नामांकीत कंपन्यांमधील विविध रिक्त पदांसाठी नोकर भरती करण्यासाठी विभागीयस्तर पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन शहरातील श्रीनिकेतन आर्टस कॉमर्स कॉलेज, सैतवाल जैन संघटन मंडळ सभागृह, गणेश नगर येथे १८ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे.
या मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त युवक युवतींनी घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त यांनी केले आहे.