Chandrayaan-3: उद्या चंद्रावर उतरणार चांद्रयान-३ | Batmi Express

Chandrayaan-3,चांद्रयान-३,New Delhi,India,

Chandrayaan-3,चांद्रयान-३,New Delhi,India,

नवी दिल्ली : 
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) बहुप्रतीक्षित चंद्र मोहीम चांद्रयान-३ साठी सज्ज झाली आहे. चार वर्षांनंतर इस्रो पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.

चार वर्षांपूर्वा हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. इस्रोचे चांद्रयान ३ अंतराळयान शुक्रवारी १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २.३५ मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

पहिल्यांदाच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार अंतराळयान -

चांद्रयान ३ हे चांद्रयान २ चा पुढचा टप्पा आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये चांद्रयान २  प्रक्षेपित करण्यात आले होते. पण, ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात अयशस्वी ठरले. चांद्रयान २ चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश झालं. त्यामुळे आता इस्रो चार वर्षानंतर पुन्हा एकदा चंद्र मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. इस्रोचे लॉन्च व्हेईकल मार्क-३ (LVM३) नावाचे तीन-स्टेज रॉकेट चांद्रयान-३ अंतराळयानासह रोबोटिक मून लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या कक्षामध्ये घेऊन जाईल. यानंतर चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

चांद्रयान-३ च्या लँडर आणि रोव्हरचे नाव -

चांद्रयान ३ सोबत यावेळी फक्त लँडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल असेल. यामध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही. तर, चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरची मदत घेतली जाईल. चांद्रयान-३ अंतराळ यानामध्ये विक्रम नावाचा लँडर आहे. विक्रम लँडर हवामानाची माहिती गोळा करण्यासाठीच्या महत्त्वाच्या उपकरणांनी सुसज्ज आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यावर विक्रम लँडरचं काम संपेल आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरील माहिती गोळ करण्याचं काम करेल.

चांद्रयान-३ मोहिमेचा खर्च किती ?

चांद्रयान-३ चे एकूण वजन ३ हजार ९०० किलो आहे. या मोहिमेसाठी सुमारे ६१५ कोटी रुपये खर्च आला आहे. चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरचा वापर केल्याने चांद्रयान-३ चा खर्च तुलनेने कमी झाला आहे. चांद्रयान २ मोहिमेसाठी ९६० कोटी रुपये तर चांद्रयान-१ साठी ३८६ कोटी रुपये खर्च आला होता.

चांद्रयान ३ चंद्रावर कधी उतरणार?

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-३ अंतराळयान २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. दरम्यान, परिस्थितीनुसार वेळ बदलू शकते.

चांद्रयान-३ चा मुख्य उद्दिष्ट -

चांद्रयान ३ चा मुख्य उद्देश चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करून तेथील पृष्ठभागाचं रासायनिक विश्लेषण करणं आहे आहे. या भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान शोधण्यास मदत होईल.

इस्रोची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिम आणि खर्च -

चांद्रयान -१ : २२ ऑक्टोबर २००८ (३८६ कोटी खर्च)
चांद्रयान -२ : २२ जुलै २०१९ (९६० कोटी खर्च)
चांद्रयान -३ : १४ जुलै २०२३ (६१५ कोटी खर्च)

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.