जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद:
चंद्रपूर:- जिल्ह्यात काल रात्री पासून अति तीव्र मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाहट सुरु आहे. या पावसामुळं जिकडे तिकडे पाणीचं पाणी झालं आहे. गेल्या 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात 85 मिमी, सावली तालुक्यात 143 मिमी, नागभीड तालुक्यात 123 मिमी, सिंदेवाही तालुक्यात 70 मिमी तर पोंभूर्णा तालुक्यात 66 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती समोर येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.