गोसीखुर्दच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस होत असल्याने गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 23 गेट अर्धा मीटरने उघडण्यात आले असून 89,424 क्युसेक पाण्याचा विसर्ग टप्याटप्याने वैनगंगा नदी पात्रात सुरु आहे. दुपारी 1 वाजताच्या सुमारास धरणातून विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आलं आहे. सध्या गोसीखुर्द चे 23 दरवाजे उघडले असल्याची माहिती पण लवकरच पुन्हा काही उर्वरीत गेट खुले करण्यात येतील. 23 दरवाज्यातून 89 हजार 424 क्युसेक पर्यंत पाणी विसर्ग वैनगंगा नदी पात्रात करण्यात येत आहे. विसर्गात पुन्हा वाढ होईल आणि उर्वरीत गेट खुले होतील- अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे.
गोसीखुर्दच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने भंडाऱ्याची जीवनदाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीचे पात्र आता दुथडी भरून वाहू लागले आहे.
गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होईल. तरी भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहेत. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.