गडचिरोली : एसटी महामंडळाच्या अहेरी आगाराची बसचा एका बाजुचे छत उखडलेल्या अवस्थेत धावत असल्याचा व्हिडीओ सोसिअल मीडिया वर बुधवारी व्हायरल झाल्यानंतर डिजिटल मीडिया आणि प्रसार माध्यमांनी तो विडिओ दाखविल्यानंतर महामंडळ ज़ोपेतून जागे झाले. या घटनेसाठी जबाबदार धरून महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेचे यंत्र अभियंता शि.रा.बिराजदार यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान अशा खिळखिळ्या झालेल्या आणि दुरूस्तीची गरज असलेल्या जवळपास २० बसेस गडचिरोली विभागीय कार्यशाळेत दुरूस्तीसाठी बोलविण्यात आल्या आहेत. त्यात अहेरी आगाराच्या ११, ब्रह्मपुरी आगाराच्या ३ तर गडचिरोली आगाराच्या ७ बसेसचा समावेश असल्याचे विभाग नियंत्रक सुकन्या सुतावणे यांनी याबाबत ची माहिती दिली.