बल्लारपूर: जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येत असल्याने वर्धा नदी दुथडी भरुन वाहत असून बल्लारपूर राजुरा मार्ग बंद झाला आहे. तसेच बल्लारपूर वरून वस्ती मार्गाने विसापुर ला जाणारा मार्ग तर काल दुपार पासून बंदच आहे.
वर्धा नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बल्लारपूर राजुरा पुल रात्री पासून पाण्याखाली गेला आहे. मार्ग अवरुद्ध झाल्याने या मार्गावर वाहनाचे रांग लागले आहेत. बल्लारपूर सस्ती मार्ग सुरू असून ते ही मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे. वर्धा नदीचे पाणी सस्ती नाल्यावर दाब मारत असून ते सुध्दा लवकरच बंद होण्याच्या स्थितीत आहे.