Chandrapur Red Alert: अतिवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात तिसऱ्यांदा रेड अलर्ट, आज सर्व शाळा महाविद्यालय बंद | Batmi Express

Chandrapur Red Alert,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,MarathiNews,Chandrapur News IN Marathi,

Chandrapur Red Alert,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,MarathiNews,Chandrapur News IN Marathi,

चंद्रपूर
: हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार उद्या दि: २७-०७-२०२३ म्हजनेच गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अतिवृष्टीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालय व महाविद्यालय यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केले असून नागरिकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले. जिल्ह्यात तिसऱ्यांदा रेड अलर्टचा इशारा एकदा पुन्हा देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.