ब्रम्हपुरी : तालुक्यातील लाडज येथे विद्युत खांबावर चढून काम करत असतांना करंट लागल्याने खांबावरच मृत्यू झाल्याची घटना बुधवार 26 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली. सूरज शिशुपाल ढवळे (24) असे मृतकाचे नाव आहे.
वीज दुरुस्ती करण्याकरिता विद्युत खांबावर चढला. दुरुस्तीचे काम करतांना अचानक ढवळे ला जोरदार विजेचा धक्का बसल्याने विद्युत खांबा वरून धानाच्या बांधीत पडला. परंतु जोरदार विजेचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला.
विद्युत खांबावर चढला तेव्हा वीज नव्हती अचानक जोरदार विजेचा धक्का बसल्याने सदर घटना घडल्याचे बोलल्या जात आहे. मात्र थोड्याश्या चुकीने आज सूरज ढवळे ला आपला जीव गमवावा लागला. मृतक ढवळे हा ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज येथील रहिवासी असल्याचे कळते. सूरज ढवळे हा विद्युत कर्मचारी नाही आहे. परंतु विद्युतचे काम करत असतो . त्याच्या अश्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून ढवळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.