चंद्रपूर: अतिवृष्टीमुळे आज जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, महाविद्यालये बंद | Batmi Express

Be
0
Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,MarathiNews,Chandrapur News IN Marathi,

चंद्रपूर जिल्ह्यात आज दिनांक 21/07/2023 रोजी झालेल्या अतिवृष्टी झाली आहे. तसेच भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार दिनांक 22/07/2023 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यावर होऊ नये या करिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये यांना दिनांक 22/07/2023 रोजी सुट्टी असणे आवश्यक आहे .

त्याअर्थी, मी विनय गौडा जी सी, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर, मला आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30 (2) (5) व (18) नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये यांना दिनांक 22/07/2023 रोजी सुट्टी जाहिर करीत आहे. मात्र, इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परिक्षा वेळापत्रकानुसार सुरु राहतील आणि सर्व निवासी शाळा नियमितपणे सुरु राहतील.

तरी नागरीकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपतकालीन परिस्थितीत खालील दिलेल्या ठिकाणी संपर्क साधावा.

तसेच आपत्कालीन परिस्थितीत 07172- 251597 आणि 07172- 272480 या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->