एटापल्ली (Etapalli) : अवैध वाळू वाहतूक करतांना दोन ट्रॅक्टर पकडून कोणतीही कायदेशीर कारवाई न करता सोडून दिल्याचा मोबदला म्हणून ३० हजर रुपयांची लाच मागणी (Demanding a bribe) करुन १५ हजार रुपये स्वीकारणाऱ्या वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
सदर घटना मौजा एटापल्ली येथील तक्रारदार यांच्या सेतु दुकानात घडली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आले आहे.
माहितीनुसार धनीराम अंताराम पोरेटी (३३) धंदा नोकरी, वनरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय एटापल्ली ता. एटापल्ली जि. गडचिरोली यांनी नदीतील १७ जून रोजी रेतीची वाहतूक करीत असलेले दोन ट्रॅक्टर एटापल्ली नाक्याजवळ पकडून कोणतीही कायदेशीर कारवाई न करता सोडून दिल्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांच्याकडून ३० हजार रूपये लाच रक्कमेची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केली व तडजोडीअंती १५ हजार रूपये लाच रक्कम तक्रारी यांचे सेतु दुकानात स्विकारतांना रंगेहाथ मिळून आले.
सदर आरोपी विरुद्ध कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलमान्वये पोस्टे एटापल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोहवा नध्छु धोटे, नापोशि राजेश पदमगिरवार, स्वप्निल बांबोळे, पोशि किशोर ठाकुर, संदीप घोरमोडे, संदिप उडाण व चापोहवा अंगडवार सर्व ला.प्र.वि. गडचिरोली यांनी सदर कारवाई केली.