आदिवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन तरुणांवर गुन्हा दाखल | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Rape,crime news,Gadchiroli,Gadchiroli live,Crime,Gadchiroli Crime,Gadchiroli Batmya,Aheri,Alapally,

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Rape,crime news,Gadchiroli,Gadchiroli live,Crime,Gadchiroli Crime,Gadchiroli Batmya,Aheri,Alapally,

अहेरी (Aheri) : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी शाळेत गेलेल्या एका अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर दोन युवकांनी अत्याचार (molestedकेल्याची घटना घडली आहे.

सदर घटना अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे शनिवारी १० जून ला रात्री घडली असून सदर प्रकरणी अहेरी पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे.

माहितीनुसार एटापल्ली तालुक्यातील रहिवासी असलेली पीडित मुलगी आलापल्ली येथील एका शाळेत शिकत होती. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी शनिवारी ती शाळेत गेली होती. त्यानंतर एका ओळखीच्या मुलाने तिला त्याच्या मित्राच्या खोलीवर नेले. त्यानंतर संध्याकाळी रोशन गोडसेलवार (२३) रा. आलापल्ली व निहाल कुंभारे (२४) रा. जीवनगट्टा, ता. एटापल्ली यांनी त्या मुलीला बळजबरीने मद्य पाजून तिच्यावर अत्याचार केला व रविवार ११ जून रोजी पहाटे तिला आलापल्ली येथील चौकात सोडून दिले. मुलीने आपल्यावर घडलेला प्रसंग चौकात जोरजोराने ओरडून सांगितली. मात्र, काही नागरिकांनी तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला. काहींनी तर तक्रार न करता तू घरी जा, असा सल्ला दिला.

त्यानंतर ती एटापल्ली तालुक्यातील आपल्या गावी गेली आणि कुटुंबीयांना आपबिती सांगितली. कुटुंबीयांनी पीडित मुलीसमवेत एटापल्ली पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडितेचे बयाण नोंदवून तपास अहेरी पोलिसांकडे वर्ग केला.
अहेरी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा आरोपींना अटक करून त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती अहेरीचे पोलिस निरीक्षक मानभाव यांनी दिली.
यातील प्रमुख आरोपी रोशन गोडसेलवार हा एका राजकीय पक्षप्रणित संघटनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.