तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर : प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या | Batmi Express

Chandrapur News,murder,Chandrapur,Warora,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur Crime,

Chandrapur News,murder,Chandrapur,Warora,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur Crime,

चंद्रपूर (Chandrapur) :
 वरोरा शहरातील फुकट नगर येथे लाकडी दांड्याच्या सहाय्याने एका तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. ही घटना आज शनिवारी 20 मे रोजी सकाळी 9.30 वाजता उघडकीस आली आहे. रीतेश रामचंद्र लोहकरे वय 19 असे मृत तरुणाचे नाव आहे.

रितेश रामचंद्र लोहकरे हा बोर्डा येथील विकास नगर येथील रहिवासी असून सकाळी एका मित्राला घेऊन फुकटनगर भागात गाडीवर फिरत होता. आणि आज त्याचा द्वितीय वर्षाचा पेपर सुद्धा होता असे समजते.

त्यानंतर थोड्याच वेळाने फुकटनगर येथील वनविभागाचे गेटजवळ फुकटनगर मधीलच आरोपी अनिमेष रेड्डी याने लाकडी दांड्याने मृतक रितेशच्या डोक्यावर प्रहार केला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेदरम्यान मृतकाच्या सोबत फिरणाऱ्या संशयित पियुष ढेंगळे याला पोलिसाने विचारपूस करण्याकरिता ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी अनिमेश रेड्डी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो फरार झाला होता.

वरोरा पोलीस त्याचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी अमिनेश रेड्डीला नागपूर येथे रेल्वे स्थानकावरून अटक केली.
घटनेचा पुढील तपास एसडीपीओ आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे करत आहे. सदर घटना प्रेमप्रकरणातून घडली अशी माहिती आहे. रितेश चा मृतदेह हा मानवी वस्तीपासून अगदी पन्नास मीटर अंतरावर आढळला. मात्र ही घटना होत असताना कोणालाच कसे समजले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.