तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Nagbhid Big Accident: टिप्परच्या धडकेत आईसह मुलाचा जागीच मृत्यू | Batmi Express

Nagbhid,Nagbhid Accident,Chandrapur News,Nagbhid News,Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur Accident News,

Nagbhid,Nagbhid Accident,Chandrapur News,Nagbhid News,Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur Accident News,

नागभीड
:- बुलेट आणि चारचाकीला टिप्परने दिलेल्या धडकेत मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. तर वडील गंभीर तर मोठा मुलगा किरकोळ जखमी झाला. ही घटना शनिवारी दि.२० मेला रात्री १२.३० च्या सुमारास नागभीड ते तळोधी (बा.) मार्गावरील पळसगाव (खुर्द) पुलावर घडली. आई कल्पना रमाकांत कड्यालवार व मुलगा साहिल उर्फ बंटी रमाकांत कड्यालवार (वय 30) असे मृत मायलेकाचे नाव आहे. ते मूळचे नवरगावचे असून सध्या सिंदेवाही येथे राहत होते. (The child died on the spot along with his mother after being hit by a tipper)


याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि.२०) सिंदेवाही येथील कड्यालवार कुटुंबातील वडील पांडुरंग, आई कल्पना, मोठा मुलगा समीर व लहान मुलगा साहिल असे चौघेजण नागपुला बुलेट गाडी विकत घेण्यासाठी गेले होते. नागपुरात गाडी विकत घेतल्यानंतर ते भिवापूर मार्गे सिंदेवाहीला परत येण्यासाठी निघाले होते. नागपूरवरुन परत येत असताना साहील हा आपल्या कुटुंबियासमवेत भिवापूर येथे आपल्या सासुरवाडीला थांबला. त्या ठिकाणी जेवण करून सर्व कुटुंबीय अकराच्या सुमारास पुन्हा सिंदेवाही कडे निघाले. चारचाकी वाहनात वडील पांडुरंग व मोठा मुलगा समीर बसले. तर बुलेटवरून साहिल व आई कल्पना हे दोघे निघाले. दरम्यान, नागभीड ते तळोधी (बा.) मार्गावरील पळसगाव (खुर्द) पुलावर बुलेट रात्री साडेबाराच्या सुमारास बंद पडली. त्यामुळे आई व मुलगा पुलावर थांबले होते.

पाठोपाठ समीर व वडील चारचाकीतून आले. बंद पडलेल्या दुचाकीला पाहत असताना विरूध्द दिशेने तळोधी (बा.) कडून भरधाव आलेल्या टिप्परने दुचाकीसह साहिल व आई कल्पना यांना जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की पुलाच्या आई व मुलगा पुलाखाली पडले. यामध्ये साहिल व आई कल्पना जागीच ठार झाले. त्यानंतर टीप्परची धडक चारचाकी वाहनाला बसली. त्यामधील वडील पांडुरंग गंभीर तर मोठा मुलगा समीर किरकोळ जखमी झाला.

अपघातानंतर चालक टीप्पर घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी वडील पांडुरंग यांना ब्रम्हपुरीला रूग्णालयात दाखल केले आहे. कड्यालवार कुटुंबिय मूळचे नवरगाव येथील होते. परंतू काही वर्षापासून सिंदेवाही येथे ते स्थायिक झाले आहेत. मृत मुलगा साहिल याचा विवाह भिवापूर येथील मुलीशी ठरलेला होता. काही दिवसांपूर्वी त्याचा साक्षगंधही आटोपला होता. येत्या दिवसात विवाह होणार होता. लग्नाची तयारी सुरू झाली होती. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू व दोघे जखमी झाल्याने कड्यालवार कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.