पतीने कुऱ्हाडीने वार करत केला पत्नीचा खून! | Batmi Express

Be
0

Gadchiroli  Live News,Gadchiroli,Korchi,Gadchiroli Batmya,Gadchiroli Crime,

कोरची, १२ मे
:- घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात कुन्हाडीने वार केले, यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार, १० मे रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास कोरची तहसील मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या बोंडे गावात घडली. तक्रारीवरून कोरची पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. समसोबाई रावजी कल्लो (55) असे मृत पत्नीचे नाव आहे. तर रावजी कल्लो असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, रात्री 10 वाजता समसोबाई कल्लो जेवण करून घरी झोपल्या. दरम्यान, बाहेरून दारू पिऊन घरी आलेल्या पती रावजीचा पत्नी समसोबाईसोबत वाद सुरू झाला, वाद शिगेला पोहोचताच रावजीने पत्नीच्या डोक्यावर कुन्हाडीने वार केले. त्यामुळे डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने समसोबाई यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कोरची पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी खुर्ची येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आरोपी रावजीविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. कोरचीचे पोलीस निरीक्षक अमोल फरतडे घटनेचा तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->