गडचिरोली: गडचिरोली पोलिस दलाचे भूसुरुंग विरोधी वाहन पोलिस जवानांना घेउन गडचिरोली वरून अहेरीला जात असताना आष्टी वरून स्वगावी म्हणजे कळमगाव कडे जाणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकी वरील एक जण जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले. तर भूसुरुंगविरोधी वाहनातील काही पोलिस जवान किरकोळ जखमी झाले. दुचाकीवरील तिघे जण हे एका लग्नसमारंभासाठी आले होते. ( Gadchiroli Accident )
लग्नसमारंभ आटोपून ते आपल्या स्वगावी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली अपघात झाल्यानंतर अनखोडा येथील नागरिकांनी जखमीना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयांत उपचारकरिता दाखल केले. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन घटनेचा पुढील तपास करत आहे.