तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर: महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाघासारखा पराक्रम करावा लागेल - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन...! | Batmi Express

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,

  • पोलीस मुख्यालयात ६३ वा महाराष्ट्र दिन साजरा
  • चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासात योगदान देण्याचे ना.मुनगंटीवार यांचे आवाहन

चंद्रपूर,दि.१:  जगातील १९३ देशांपैकी १४ देशांमध्ये वाघ आहेत. त्यातील ६५ टक्के वाघ भारतात आहेत. पण संपूर्ण जगात सर्वाधिक वाघ असलेला चंद्रपूर हा एकमेव जिल्हा आहे. ही आनंदाची बाब आहेचपण आता महाराष्ट्राच्या विकासासाठी वाघासारखा पराक्रम गाजविण्याची जबाबदारी देखील चंद्रपूर जिल्ह्यावर आहेअसे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तसेच चंद्रपूर  (Chandrapur) जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Guardian Minister Sudhir Mungantiwar)  यांनी केले.


पोलीस मुख्यालय येथे ६३ व्या महाराष्ट्र दिनानिमीत्त आयोजित ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. झेंडावंदन व परेडचे निरीक्षण झाल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी आमदार सुधाकर अडबालेजिल्हाधिकारी विनय गौडाजिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रकुमार परदेशीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनमनपा आयुक्त विपीन पालिवालडॉ. मंगेश गुलवाडे,अतिरिक्त पोलीस अधिक्षक रिना जनबंधूअतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडेआदींची प्रमुख उपस्थिती होती.


सुरुवातीला महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा ना. मुनगंटीवार यांनी दिल्या. ते म्हणाले, ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा… या महाराष्ट्र गितातील ओळींप्रमाणे जबाबदारी पूर्ण करण्याचा संकल्प सोडणे म्हणजे महाराष्ट्र दिन साजरा करणे होय. महाराष्ट्राच्या भूमीतील छत्रपती शिवाजी महाराजक्रांतीसूर्य ज्योतिराव फुलेक्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेमहामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी देशाच्या प्रगतीमध्ये मोठी जबाबदारी पार पाडली. पण त्यांचे फक्त स्मरण करून होणार नाही. त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी लागेल.’ संविधानातील नागरिकांच्या कर्तव्यांची त्यांनी आठवण करून दिली. संविधानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागरिकांची कर्तव्ये देखील नमूद केलेली आहेत. दुर्दैवाने आज देशात ते संविधानातील मूलभूत कर्तव्य वाचणाऱ्यांची संख्या कमी आहे. चंद्रपूरकरांनी ही जबाबदारी पार पाडणे हाच खरा महाराष्ट्र दिनाचा संकल्प ठरेल,’ असे ना. मुनगंटीवार म्हणाले.


येत्या पाच वर्षांत शेतीच्या संदर्भातील योजनांमध्ये चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहील असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. ग्रामीण व शहरातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी हर घर जल’ या माध्यमातून १ हजार ३०२ योजनांना परवानगी दिलीअसेही ते म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेत पूर्वी १ लाख ५० हजार रुपयांपर्यंतच अनुदान मिळायचे. आता ते ५ लाख रुपये करण्यात आले. तसेच निराधारपरितक्त्या यांचे अनुदान १५०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने हा उत्सव भामरागड ते रायगड मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहेअशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली.

दरम्यानरेडक्रॉस सोसायटीद्वारे तयार करण्यात आलेल्या मोबाईल टेस्टिंग व्हॅनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण केले. गावपातळीवर महिला सक्षमीकरणाच्या कामात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध विभागाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तर जिल्हा स्तरावर आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांनाही यावेळी गौरविण्यात आले.


महाराष्ट्राला अभिमान:


राज्याचा अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर देशाच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा रेव्हेन्यू सरप्लस ११ हजार ७५ कोटी केला. आज देशाच्या जीडीपीमध्ये सुद्धा महाराष्ट्राचे योगदान १५ टक्के आहे. चंद्रपूरचा नागरिक म्हणून मला याचा अभिमान आहेअशी भावना त्यांनी व्यक्त केली.


चंद्रपूरच्या विकासाची २०५ कामे:


चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी २०५ कामांचे नियोजन केले. वन अकादमीबॉटनिकल गार्डनसैनिक शाळा यासोबत आता टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचे काम सुरू आहे. टाटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी ९० गावे दत्तक घेऊन कृषी उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिशन जय किसान’ या योजनेतून शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचा संकल्प केला आहेअसेही ते म्हणाले.


अडिच लाख शेतकऱ्यांना लाभ:

नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा चंद्रपूर जिल्ह्यातील अडिच लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहेअशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली. स्व. गोपिनाथ मुंडे पिक विमा योजनेतील सानुग्रह अनुदान २ लाख रुपये करण्यात आला असून २०१८ पासून १० कोटी २९ लाख शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आलेअसे त्यांनी सांगितले. फक्त १ रुपयांत पिक विमा योजना आणल्याचेही ते म्हणाले.


अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र:


राज्यातील उत्तम आरोग्य सेवा चंद्रपुरात मिळावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींची उभारल्या जात आहेत. १४ नवीन इमारतींचे काम झाले असून इतर इमारतींचे लवकरच पूर्णत्वास येईल. जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देत अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र अस्तित्वात येतीलअसा प्रयत्न असणार आहेअशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली. यासोबतच आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या योजनेअंतर्गत १५ हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ आणि नागरी आरोग्य केंद्र आजपासून नागरिकांच्या सेवेत येत असल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.